सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मळशी-वाणेवाडी दरवर्षी येथील श्री दत्त तरुण मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात श्री गणेशाच्या आगमनापासून ते संपूर्ण दहा दिवस विविध कार्यक्रम घेत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची, लहान मुलांची गाणी, वादन, संभाषण वक्तृत्व ,कथाकथन अशा विविध स्पर्धा कार्यक्रम घेत असतात यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो व हक्काचे व्यासपीठ असल्याने त्यांचे भवितव्य चमकण्यास मदत होत असते त्यांना बक्षीसचे स्वरूप म्हणून शालेय वस्तू देत असतात जेणेकरून त्यांना दिलेल्या बक्षिसाचा पुरेपूर उपयोग व्हावा.
गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सलग आठ वर्ष कुठल्याही प्रकारच्या डीजे न लावत गुलालाची उधळण न करत फक्त कीर्तन भजन टाळ मृदंगाच्या गजरात गणेश उत्सव हा एक वारी स्वरूपात विसर्जन मिरवणूम काढत असतात .
या मिरवणूक प्रसंगी लहान मुले महिला तसेच घरातील सर्व सदस्य तसेच सर्व जाती धर्म एकत्र येत या मिरवणुकीचा आनंद घेत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
गणेश उत्सव पार पाडण्यासाठी अक्षय खराडे , उद्देश जगताप ,आयाज शेख ,सुजल जगताप तसेच सिद्धराज जगताप यांनी पुढाकार घेतला होता.