"श्री स्वामी समर्थ" यांचा सुंदर गौरी गणपती निमित्त देखावा साकारल्याने मुरूम येथील प्रियाभोईटे यांचे कौतुक.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - जगभरात गौरी गणपती उत्सव हा महिला वर्गांसाठी महत्त्वाचा उत्सव मानला जातो या उत्सवामध्ये गणेशाची मूर्ती दहा दिवस तर गौरी चे आगमन झाल्यानंतर गौरी पूजन गौरी हळदी कुंकू व निरोप असे तीन दिवस असतात बुधवार रोजी हळदी कुंकू निमित्त मुरूम (ता बारामती ) येथील प्रिया हिम्मत भोईटे यांनी "श्री स्वामी समर्थ" ज्ञानसाधना असा सुंदर देखावा केल्याने त्यांचे महिला वर्गाकडून कौतुक होत आहे.
बारामती तालुक्यातील मुरूम नवतरुणन गणेश मंडळ आयोजित सौ प्रिया हिम्मत भोईटे यांनी गौरी गणपती उत्सव निमित्त साकारलेल्या उत्कृष्ट देखावा बद्दल सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे ..यामध्ये प्रिया भोईटे यांनी हुबेहूब प्रतिकात्मक कारगिल युद्ध... कोरोना एक संकट.(घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन) .. सेल्फी धोकादायक अशा विविध समाज उपयोगी देखावे करत बक्षीस मिळवले आहे .
पुढील वर्षी येणाऱ्या गौरी गणपती उत्साहातनिमित्त एक समाज उपयोगी सुंदर व आकर्षक देखावा करणार असल्याचेही प्रिया भोईटे यांनी बोलताना सांगितले.