सोमेश्वरनगर-वाघळवाडी हद्दीतील वनविभागात झाडाला एका युवकाने घेतला गळफास
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाघळवाडी सोमेश्वरनगर हद्दीतील वनविभाग हद्दीत रा. कोऱ्हाळे २२ फाटा येथील रहिवासी असलेल्या अजित नंदकुमार ठोंबरे वय २२ वर्षीय
युवकाने वनविभागातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नसून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजेपूल दूरक्षेत्र चे पोलीस हवलदार अमोल भोसले ,सागर देशमाने ,कॉन्स्टेबल परगे घटनास्थळी दाखल झाले . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.