Type Here to Get Search Results !

बारामती ! बारामतीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उसळलेला मोठा जनसागर.

बारामती ! बारामतीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उसळलेला मोठा जनसागर.
बारामती - सोमवार दिनांक 3 रोजी असलेल्या बारामतीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उसळलेला मोठा जनसागर हे दृश्य कायम संस्मरणीय राहील. यावेळी माझ्या भगिनींशी, शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्याचप्रमाणे बैलपोळा सणाच्या माझ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

सर्वप्रथम मी बारामतीकरांचे मनापासून आभार मानतो की, माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत मी अनेक राजकीय पदं भूषवली, त्याचं श्रेय बारामतीकरांना जातं. तुम्ही भक्कम पाठिंबा दिलात म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तुम्ही जनता, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुमच्याच सेवेकरता अनेक शासकीय योजना आम्ही सुरू केल्या आहेत. त्यापैकीच माझी लाडकी बहीण योजना ही राज्यभरात अतिशय लोकप्रिय ठरली. मी काम करत असताना कधीच जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार केलेला नाही, कायम सर्व समाजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आलो आहे. योजनांच्या बाबतीतही कोणावर अन्याय होऊ देणार नाही, जो पात्र त्याला लाभ नक्कीच मिळेल, हा तुमच्या दादाचा शब्द आहे.

बारामतीचा विकास कशा पद्धतीनं झपाट्यानं होत गेला, हे माझ्या बारामतीकरांनी पाहिलं आहे. यापुढेही विकासाची गंगा आपल्या बारामतीत वाहत राहील. नवनवीन योजना देखील आम्ही राबवत राहू. गोरगरिबांच्या मुलींसाठी आपण शिक्षण मोफत केलं आहे. बारावी आणि पदवीधरांना आपण प्रशिक्षण भत्ता देत आहोत. गोरगरिबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपण मोफत देत आहोत. शेतकरी बांधवांसाठी एक रुपयात पिक विमा योजना आपण काढली आहे. शेतकऱ्यांची वीज बिलं आपण माफ केली आहेत. 

माझ्या भगिनींच्या सुरक्षेच्या बाबतीत हे राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. नराधमांना अशी शिक्षा द्यायची की, पुन्हा कोणी असा गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही. या विकृतांना फाशीच मिळाली पाहिजे. सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम करण्याच्या अनुषंगानं राज्य सरकार ठोस पावलं उचलत आहे. माझी माझ्या बारामतीकरांना एकच विनंती आहे की, मी तुमच्यासाठी सदैव झटत राहीन, विकास कामं करत राहीन, नवीन अभिनव योजना राबवत राहीन मात्र, त्यासाठी तुमचा आशीर्वाद मला हवाय, तुमचा भक्कम पाठिंबा मला हवाय, तुमचा विश्वास माझ्यावर कायम असू द्या.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test