बारामती - सुपा पोलीस स्टेशनची पुन्हा एक दमदार कामगिरी दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगारास शिताफीने अटक करुन त्याचे कढुन लाखो रुपयाचे गुन्हयात चोरलेले सोन्या, चांदीचे दागीने हस्तगत. पुणे ग्रामीण जिल्हात दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने सदरचे आरोपी अटक करणे हे पोलीसा समोर एक मोठे आव्हान झाले होते.
सदरच्या घडणा-या गुन्हया बाबत मा.पोलीस अधिक्षक साो पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, मा.उप. विभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिवसा व रात्री घरफोडी करणारे आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक २५ रोजी गुप्त बातमी दारामार्फत मिळालेली माहिती व तांत्रीक तपासा वरुन संशईत आरोपी पांडुरंग भाऊसो कुदळे वय ४० वर्षे रा.गिरीराज नगर पिंपळी (ता. बारामती )ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस चौकशी करता त्याने सुपा पोलीस स्टेशनचे हाद्दीत देऊळगाव रसाळ ता. बारामती येथे दिवसा घरफोडी केली असल्याची कबुली दिली.
सुपा पोलीस स्टेशनने पांडुरंग भाऊसो कुदळे यांच्याविरुद्ध गुणा नोंद केलेला असून चोरलेला एकुन ४९ हजार ५०० रुपये मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व गुन्हा इतर वस्तु असा एकुन १लाख ३९ हजार ६५० रुपये मुद्देमाल जप्त करुन २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक साो पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, मा.उप. विभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो. नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई.जिनेशकोळी, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो.कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे यांनी केली आहे.