सोमेश्वरनगर - संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे तसेच युवा नेते योगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाने गुरुवार २६ रोजी बारामती तालुक्यातील विद्यालय तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी-युवती-युवक यांना बारामती-सुपा व निरा-बारामती या बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गैरसोय टाळण्यासाठी बारामती तालुका युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष प्रियांका शेंडकर आणि महाविद्यालयीन युवती यांनी लेखी निवेदन आगार प्रमुख वृषाली तांबे यांना दिले.
आगारातून बस वेळेवर सुटाव्यात अशा आशयाच्या मागणीचे पत्र दिले तसेच यावर तांबे मॅडम यांनी या दिलेल्या निवेदनाची दखल घेत यापुढे बस वेळेवरच येईल असे आश्वासन दिले.