रविवार दि २२ सप्टेंबर २०२४ रोजी स. ७ वा. सुमारास दौंड शहरामध्ये लिंगाळी वेताळ नगर नवीन कोर्टाच्या पाठीमागे काटेरी दाट झाडीमध्ये गाईंची कत्तल चालू असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांना मिळाली जगताप यांनी गोरक्षक संकल्प पाटोळे व राहुल बारुंगुळे यांना दौंड पोलीस स्टेशन येथे पाठवून पोलीस प्रशासनाला सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली माहिती मिळताच तत्काल गोरक्षकांसह दौंड पोलीस टीम घटनास्थळी गेली पोलीस आल्याची चाहूल लागताच कसायांनी तेथून पळ काढला सदर ठिकाणी पाहणी केली असता काटेरी झुडपामध्ये भिंती असलेले पत्र्याचे मोठे दोन शेड दिसून आले त्यासमोर एक रिक्षा उभा होता त्यामध्ये गोमांस ठेवलेले दिसून आले. शेडमध्ये पाहिले असता रक्ताने माखलेले भले मोठे थारोळे गोवंशांची सोललेली चमडी पोटातील आतडे अर्धवट सोडलेले मुंडके दिसून आले. ५२५ की. गोमांसासह रिक्षा असे २,७८,७५०/ रु. किमतीचा मुद्देमाल दौंड पोलिसांनी जप्त करून पो. हवा. किरण लालासो ढुके यांच्या फिर्यादीवरून कुमेल (हाजी) कुरेशी, मोहसीन इब्राहिम कुरेशी, शहाबाद उर्फ शाबु गुलाब कुरेशी, मौजेम गफार कुरेशी, यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून जप्त केलेले गोमास पंचांसमक्ष डिस्पोझ करण्यात आले. प्राणीमित्र अहिरेश्वर जगताप, संकल्प पाटोळे, तेजस कोंडे, फिरोज पठाण, विकास शेंडगे, राहुल बारंगुळे, रोहित केदारी, महादेव टकले, हे कारवाई वेळे उपस्थित होते पुढील तपास पो. हवा. शिंदे हे करीत आहेत.
तालुक्यातील...या ठिकाणी चालला होता अवैध कत्तलखाना... मग काय गोरक्षकांसह पोलिसांचा छापा
September 25, 2024
0
तालुक्यातील...या ठिकाणी चालला होता अवैध कत्तलखाना... मग काय गोरक्षकांसह पोलिसांचा छापा
Tags