सोमेश्वरनगर - करंजे ग्रामपंचायत (ता बारामती )यांची मंगळवारी दि २४ रोजी करंजे ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडणूक मंगळवार दि २४ रोजी करंजे सरपंच भाऊसो हुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी अँथनी मुलाणी, राकेश गायकवाड, सचिन पाटोळे उमेदवार होते.
यामध्ये सचिन पाटोळे यांना १६७ व अँथनी मुलाणी यांना ११० आणि राकेश गायकवाड यांना ११० मते मिळाली . मतमोजणीनंतर सरपंच भाऊसो हुंबरे यांनी अधिकची मते मिळाल्याने सचिन पाटोळे हे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले व ग्रामपंचायत कार्यालय येथे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे यांचे हार पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी करंजे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर, सर्व सदस्य , कर्मचारी वृंद मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर ठाणे अंकित करंजेपुल दूरक्षेत्र पोलीस अधिकारी दीपक वारूळे व कॉन्स्टेबल परब यांचे विशेष सहकार्य लाभले.
निवडी नंतर सचिन पाटोळे यांनी सर्व ग्रामस्थ ,गावातील सर्व मित्र मंडळ महिला भगिनी यांचे आभार मानले व गावातील छोटे- मोठे वादविवाद गावातच दूर करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्याचा मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत बोलताना व्यक्त केले.