तालुका स्तरावर मौलाना आझाद महामंडळाचा सर्वात मोठा निधी : उद्या होणार खासदारांच्या हस्ते मंजूरी पत्राचे वितरण.
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अथक मार्गदर्शन व प्रयत्नातून व मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या सहकार्याने बारामती शहर व तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे ८ कोटी १० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर झालेल्या निधीचे मंजूरी पत्र वाटपाचा कार्यक्रम बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते मंगळवार दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन कसबा बारामती याठिकाणी होणार आहे.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती कर्ज योजना राबविण्यात आली होती. बारामती शहर व तालुक्यात २५० लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लाख रूपये मंजूर झाले असून, ३० बचत गटांना प्रत्येकी २ लाख असे ६० रूपये असे सर्व मिळून ८ कोटी १० हजार रूपये बारामती शहर व तालुक्यासाठी मंजूर झाले आहे.
यापूर्वी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नातून सन २०२२-२३ ला ३ कोटी तर २०२३-२४ ला ४ कोटी ५० लाख असे मिळून साडे सात कोटी रूपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आलताफ सय्यद यांनी केले आहे.