Type Here to Get Search Results !

शोभेच्या दारू व फटाके विक्रीच्या परवान्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Top Post Ad

शोभेच्या दारू व फटाके विक्रीच्या परवान्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बारामती :दिवाळी उत्सवासाठी बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने देण्यात येणार असून त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

साध्या कागदावरील अर्जास १० रूपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा अथवा दुसऱ्याची जागा असल्यास त्या जागेचा वापर करण्यास संबंधिताचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तसेच जागा सुरक्षिततेबाबत अर्जदार यांचे १०० रूपयाच्या स्टॅम्पसवर प्रतिज्ञापत्र साक्षांकित करून देणे गरजेचे आहे.

पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांच्याकडील शोभेची दारू व फटाके साठा, विक्रीची सुरक्षिता आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे याबाबतचे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायाची जागा सुरक्षित असल्यातबाबतचे प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगरपालिकेचे दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत, अर्जासोबत परवाना शुल्क ६०० रुपये चलनाने भरून मूळ चलन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. परवान्याची मुदत संपल्यारनंतर परवाना धारकांनी शिल्लक राहीलेला साठा जवळ ठेवू नये. शिल्लक राहीलेला साठा कायम स्वरूपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.