...म्हणून कोजागिरी पौर्णिमा सण साजरा करावा
कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी असलेला कोजागिरी पौर्णिमा या दिवशी पाटावरती लाल वस्त्रावर लक्ष्मीची मूर्ती ठेवत पूजा केली जाते कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज आज रोजी संध्याकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी मसाले दुधामध्ये चंद्र पाहत दूध प्राशन करायचे असते असे महत्त्व आहे
हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.आणि मध्यरात्री 'को जागर्ति' ...म्हणजे 'कोण जागत आहे' असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.
अडीअडचणी प्रयत्नशील कौटुंबिक सुख विचारत त्याचे संकट दूर कसे होईल हे विचारत असते अशी एक आख्यायिका आहे