श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०१८-१९ सालच्या मुदत ठेव व्याजाच्या रक्कमेतुन बेकायदेशीरपणे कपात करून घेतलेल्या सर्व रक्कमा सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे - सतिशराव शिवाजीराव काकडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षीक सर्व साधारण सभा दि.२७/९/२०२४ रोजी झाली त्यामध्ये मुदत संपलेल्या परतीच्या ठेवी व त्यावरील व्याज सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचे एकमताने ठरले असताना संचालक मंडळाने हेतुपरस्पर जाणीवपुर्वक ज्या सभासदांनी पुढील हंगामासाठी उस रोपे कारखान्याकडुन घेतली आहेत त्याची येणे बाकी व इतर कपाती चालु येणाऱ्या उसबीलातुन घेणे गरजेचे असताना दिपावलीमध्ये सभासदांना चार पैसे मिळु नये अशी आडमुठी भुमीका संचालक मंडळाने घेवुन सभासदांप्रती विश्वास दाखवला नाही. हे अत्यंत चुकीचे आहे आज आपण राज्यात ३५७१/- रू प्र. मेटन उच्चांकी भाव दिला असे कारखाना सांगतो म्हणजेच कारखान्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजुला कारखान्याने सुमारे ३ कोटी रूपये कपात केल्याचे समजते. जे पुर्णपणे बेकायदेशीर आहेत व वार्षीक सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या विरूध्द संचालक मंडळ वागत आहे.
तरी आपण दिपावली सणानिमीत्त कपात केलेल्या सर्व सभासदांची रक्कम तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी अन्यथा सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व नाईलाजास्तव शेतकरी कृती समितीस आंदोलन/उपोषण उभे करावे लागेल. तसेच याबाबत मा. अजितदादा पवार यांचेही कानावर वरील विषय घालणार आहे. व साखर आयुक्त साो, प्रादेशिक सहसंचालक यांचेकडेही तकार करावी लागेल. तरी याची दखल घेवुन सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ कपात केलेल्या रक्कमा १ आठवडयात वर्ग कराव्यात.