...म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी आपणास मिळावी..अन..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हीच एका कार्यकर्त्याची इच्छा.
माननीय श्री.अजितदादा पवार साहेब कार्यसम्राट उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांना
सस्नेह नमस्कार....
आदरणीय दादा, प्रथमतः आपल्या कुशल नेतृत्वाला माझा सलाम!
अवघ्या महाराष्ट्राचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या बारामती तालुक्याची ओळख जगभरात आपल्या कार्यकर्तृत्वाने निर्माण करणारा
एक लोकप्रतिनिधी म्हणून दादा आपण मला नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व वाटता.
की जे सक्रिय राजकारणात आपण आल्यापासून स्वतःच्या कुटुंबासाठी कमीत कमी वेळ देता. व अधिकचा वेळ समाजकार्यासाठी देता. असा नेता देशात आणि परदेशात ही पुन्हा होणे नाही.
अशी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आपल्याबद्दलची भावना आहे. म्हणूनच हा पत्र प्रपंच करीत आहे.
निरपेक्ष वृत्तीने एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्यातील सामान्य व्यक्तीला मदत करण्याची भावना...
दादा, आपल्याकडे नेहमीच आहे. याचा मला मनापासून अभिमान वाटतो.
व्यक्तिगत जीवन असो किंवा सार्वजनिक जीवन असो, माणुस कितीही करारी असला तरी त्याची दुसरी बाजू ही खूप प्रेमळ व मायेची असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादा आपण आहात.
पुढे जाऊन मी तर असे म्हणेन की, लोकप्रतिनिधी म्हणून
आदरणीय दादा आपले सामाजिक व राजकीय कर्तृत्व पाहिले असता ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेण्यासारखे आपले कार्यकर्तृत्व आहे. असे मला वाटते.
दादा आपला स्वभाव स्पष्ट वक्ता असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यावर चर्चा होते.
परंतु अनेक कामांच्या रणधुमाळीमध्ये अनावधानाने एखादा शब्द चुकून जातो. तेव्हा नागरिकांनी त्याचा फार बाऊ न करता आपल्या हातून होणाऱ्या समाजकार्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सामाजिक व लोकहिताच्या कार्यात काळ व वेळ याचे कोणतेही बंधन न ठेवता हजारोंच्या गर्दीत उठून दिसणारा आमचा नेता आपण अजितदादा आहात.
हा अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे.
आणि म्हणूनच मी महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना विनंती करेल की, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विचारांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या.
आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची संधी आपणास मिळावी.
व आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. हीच माझी या निमित्ताने परमेश्वराकडे विनम्र प्रार्थना आहे.
जय हिंद, जय राष्ट्रवादी
कळावे
आपला निष्ठावंत कार्यकर्ता
श्री.संभाजीराव बाळासाहेब काकडे- देशमुख
मा. चेअरमन- साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटी निंबूत ता- बारामती जि. पुणे
भ्रमणसंवाद - ७९७२१०४१५४