बारामतीचा पट्ट्या....सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता... बिग बॉसची ट्रॉफी बारामतीच
बारामती प्रतिनिधी
बरेच दिवसापासून चाललेल्या. 'बिग बॉस मराठी ५' चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात बारामतीतील मोडवे येथील रीलस्टार सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या कर्तुत्व व सर्वांच्या आशीर्वादाने खेचून आणली आहे . बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने 'बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे सर्वत्र बारामती तालुक्याचे पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण दिसत आहे, त्सुरजच्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला असून त्यांनी सुरज चव्हाण वर व्हाट्सअप माध्यम स्टेटस तसेच फेसबुक इंस्टाग्राम च्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत असताना दिसत आहे.
बारामती तालुक्यातील गुलिगत धोका फेम सुरज हा एका छोट्याश्या मोडवे गावातला मुलगा आहे. टिक टोक इंस्टाग्राम फेसबुक च्या माध्यमातून रील बनवून सूरजला प्रसिद्धी मिळाली होती ही सर्वांनीच पाहिले आहे. तू एक सामान्य व गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे. त्यामुळे बारामतीकर सुरज चे स्टेटस व व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक माध्यमातून त्याला अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव करताना दिसत आहेत.