सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय निवडणूक आयोग व उपविभागीय कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री. रमेश कवितके सर उपस्थित होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस, पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या.प्रसंगी कवितके सरांनी विद्यार्थी व शिक्षकांना राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार सर्व नागरिकांनी यशस्वीपणे मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे व मतदान टक्केवारी शंभर टक्के कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना, आई-वडिलांना याची माहिती देऊन त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. व अठरा वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान हक्क बजावला पाहिजे . तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान नाव नोंदणी करावी असे आव्हान केले व शेवटी मतदार जनजागृती प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल गोलांदे यांनी केले तर आभार पृथ्वीराज वाघमारे यांनी मानले.