Sports आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले.
विद्यालयातील गौरी नितीन कुतवळ हिने १७ वर्ष वयोगटातून उंच उडीत प्रथम तर १०० मीटर हर्डल्स प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तर पायल गणेश मालक हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी दोन्ही खेळाडूंची बालेवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यालयातील क्रीडा शिक्षक बी सी बालगुडे व एस टी जेधे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, सचिव भारत खोमणे, विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक एस पी होळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालभाई शेख, आंबी बुद्रुक व खुर्दच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.