Type Here to Get Search Results !

Someshwar Nagar शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे दोन दिवसीय "इंडकशन प्रोग्रॅम संपन्न.

Someshwar Nagar शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे दोन दिवसीय "इंडकशन प्रोग्रॅम संपन्न.
मुख्य संपादक विनोद गोलांडे.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय (इंडकशन प्रोग्रॅम) २०२४-२५ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मोटिवेशनल स्पीकर डॉ. दिनेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोतम जगताप, माजी व्हाइस चेअरमन व संचालक प्रतिनिधी  आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव श्री भारत खोमणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर, उपप्राचार्य डॉ शरद गावडे, महावि‌द्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर यांनी महावि‌द्यालयाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले व कार्यक्रमाचा उ‌द्देश सांगितला.
प्रथम दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ दिनेश गुप्ता यांनी "विंनिंग माइंडसेट" या विषयावर उपस्थित २०० च्या वरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, स्वतःच्या मनाचे ऐका.... स्वताच्या शोधात बाहेर पडा असे आवाहन त्यांनी वि‌द्यार्थ्यांना केले.

यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर व डॉ शरद गावडे यांनी NEP २०२० या नवीन शिक्षण प्रणालीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्रॅम ऑफिसर प्रा दिनेश काटे यांनी NSS योजनेअंतर्गत पार पडणाऱ्या शिबिराची माहिती दिली. green क्लब ऑफिसर प्रा जयश्री खताळ यांनी या क्लब अंतर्गत पडलेल्या विविध उपक्रमाची माहिती विध्यार्थ्यांना सादर केली.

 कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या डॉ अमृता वाकचौरे यांनी "Key Success " या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व पटवून देत अभ्यासात सातत्य ठेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करन्याचे आवाहन केले.

महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर यांनी NEP २०२० FE Syllabus आणि करियर गायडन्स बद्दल विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

याप्रसंगी सर्व विभागप्रमुखानी डॉ शरद गावडे, प्रा सचिन इथापे, प्रा गणेश गाढवे, प्रा सलोनी शाह, प्रा सुरज खलाटे यांनी आपल्या शाखेचे महत्व विषद करून प्रत्येक शाखेकरिता महाविद्यालयात असलेल्या सुविधांबाबत मार्गदर्शन व सादरीकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रत्येक विभागाला जाऊन भेट दिली. महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा चिन्मय नाईक यांनी पदवीच्या परीक्षेसंबंधी नियम, परीक्षा अर्ज भरणे साठी मार्गदर्शन तत्वे व ग्रेड सिस्टिम बाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी महावि‌द्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येचे उपस्थित होते. प्रा प्रतिमा शिंदे व प्रा सायली कदम यांनी सूत्रसंचालन तर प्रा नवनाथ वाबळे यांनी आभार मानले.
 हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा नवनाथ वाबळे, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test