जिल्हा विभागीय कुस्ती स्पर्धेत काजल जाधव हिने सुवर्णपदक केले संपादित.
कळंब -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती मुली स्पर्धा अमृतेश्वर महाविद्यालय विंझर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील खेळाडू कु. काजल जाधव (fyba) 65 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक संपादित केले आहे.
या गुणी खेळाडूची आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली असून सदर स्पर्धा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
तसेच नुकतेच काजल हिने बर्कतुल्लाह विद्यापीठ भोपाळ या ठिकाणी ज्युदो क्रीडा प्रकारामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.