Type Here to Get Search Results !

बारामती ! अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी बारामती ते शिर्डी पायीवारी

Top Post Ad

बारामती ! अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी बारामती ते शिर्डी पायीवारी
बारामती : श्रद्धा आणि सबुरी या साई बाबांच्या वचनाने मानवी जीवन सुंदर होत असताना समाजकारणात अजित पवार यांनी सुद्धा योगदान दिल्याने आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवल्याने या वेळेस त्यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी या विचाराने २०२४ चा पालखी सोहळा साईबाबा च्या चरणी प्रार्थना करण्यासाठी गुरुवार (दि.२८) नोव्हेंबर रोजी बारामती हुन शिर्डी कडे प्रस्थान केले.
बारामती ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा साईच्छा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष व बारामती नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मूथा, मुख्यधिकारी, प्रशासक महेश रोकडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे व अविनाश बांदल, डॉ सौरभ मूथा, दिनेश जगताप, शब्बीर शेख, शिर्डीचे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे, रमेश सोनवणे, तुषार थेटे, मंगेश चौधरी, मातंग एकता आंदोलनचे राजेंद्र मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

१३ वर्षा पासून सदर पालखी सोहळा करत असताना व्यसन मुक्ती, सार्वजनिक वाचनालय, गुणवंत विद्यार्थी गौरव, स्पर्धा परीक्षा साठी सहकार्य आदी उपक्रम पालखी सोहळ्यास जोडीला घेत असतो. यावर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प पूर्ण व्याहवा म्हणून हजारो भक्तासमवेत साई चरणी प्रार्थना करणार असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.

डॉ आंबेडकर वसाहत चे रुप बदलले आहे. त्या मध्ये साई विचारांचा प्रभाव आहे. परिसरात साई भक्त वाढल्याने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इमारत उभी राहिली व बारामतीच्या वैभवात भर घालत असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले. अध्यात्म व विकास कामे करत असताना बिरजू मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहास नोंद घेईल इतके उपक्रम राबविले व तालुक्यात सर्वप्रथम साई बाबा पालखी सोहळा सुरू करण्याचा मान पटकाविला असल्याचे भारती मूथा यांनी सांगितले. या प्रसंगी पालखी सोहळ्यात वासुदेव ची भूमिका करणारे राजेंद्र साळुंखे, पुजारी हरिभाऊ केदारी, हरीभाऊ गोंडे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार प्रदर्शन मांढरे यांनी केले.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.