बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आज सोमवार रोजी पार पडली.. या सभेला बारामतीकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत अजितदादांवरील विश्वास व्यक्त केला.. दरम्यान, युवा नेते पार्थदादा पवार यांनी चक्क कार्यकर्त्यांसोबत दुचाकीवर बसून अजितदादांचं भाषण ऐकलं.. कोणताही अविर्भाव न बाळगता पार्थदादा पवार यांनी दाखवलेला साधेपणा उपस्थितांना भावणारा ठरला..