प्रजासत्ताक दिनी रस्ते सुरक्षितेच्यादृष्टीने जनजागृती फेरी संपन्न
बारामती - प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस वाहतूक शाखा, रायडर हब व ड्रायविंग स्कूल संघटनेच्या सयुंक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय-पेन्सिल चौक, तीन हत्ती चौक, गुणवडी चौक व कसबा चौक-उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यादरम्यान दुचाकीवर हेलमेट व चारचाकी चालवितांना सीटबेल्ट वापरण्याबाबत जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम आणि वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, ड्रायविंग स्कूल संघटनेचे मालक व चालक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. निकम म्हणाले, नागरिकांनी वाहने चालवितांना हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याबाबतच रस्ता सुरक्षा नियमांचेही काटेकोरपणे पालन करावे. रस्ते अपघात टाळून अपघात मुक्त परिसर करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. निकम यांनी केले.