आजी माजी सैनिक संघटना वतीने प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा.
सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिर चे आयोजन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटना वतीने रविवार दि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,माजी सैनिक माजी सैनिक ज्येष्ठ राजाराम शेंडकर यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला व संविधान वाचन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,आंतरराष्ट्रीय धावपटू अंकुश दोडमिशे, करंजेपूल सरपंच पूजा वैभव गायकवाड ,वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे व उपस्थित पोलीस अधिकारी होते ,साई सेवा हॉस्पिटलचे डॉ राहुल शिंगटे व डॉ. विद्यानंद भिलारे ,डॉ जयश्री भिलारे, डॉ शुभम ओम शहा उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सोमेश्वर परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात चांगले काम करत आहे, कोरोना कालावधी तसेच दरडग्रस्तांना मदत मोठ्या प्रमाणात संघटनेमार्फत केल्याने त्याचे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष जगताप यांनी आभार मानत कौतुक केले.सैनिकांविषयी असलेले वाद विवाद त्यांनी परस्पर मिटवण्याल्याने वडगांव निंबाळकर प्रशासन वतीने साबळे यांनी आभार मानत चांगले काम करू अशी ही ग्वाही कार्यक्रम प्रसंगी सैनिक संघटना वतीने देण्यात आली. विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत यांनी संघटनेच्या कामाचा वृत्तांत व विद्यार्थ्यांना कायम मदतीचा हात तसेच त्यांचे कार्यही सोमेश्वर पंचक्रोशीत अभिमानास्पद आहे असेही सावंत यांनी बोलताना सांगितले. सामाजिक उपक्रम म्हणून साई सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून सैनिक व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त कृतिका किरण सोरटे या विद्यार्थिनींनी "सुनो गोरसे दुनियावालो'या गीतावर नृत्य करत प्रमुख पाहुण्यांसह आजी-माजी सैनिक संघटना व उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याला या वर्षात मिळालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचा देखील सत्कार उपस्थित जेष्ठ सभासद नागरिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, ज्येष्ठ राजाराम शेंडकर, मोहन शेंडकर, गणेश शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, कोषाध्यक्ष किरण सोरटे, तक्रार कमिटी अध्यक्ष अँडो.गणेश आळंदीकर,सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, संघटना सदस्य जेष्ठ राजाराम शेंडकर, मोहन शेंडकर, ताराचंद शेंडकर ,राजेंद्र पवार, मनोज गायकवाड, मीनानाथ होळकर, विकास साबळे, चौधरी, विक्रम लकडे, बाळासाहेब गायकवाड, कोषाध्यक्ष किरण सोरटे, ज्ञानेश्वर कुंभार, दत्तात्रय चोरगे, मोहन शेंडकर, सुभेदार मेजर कांबळे साहेब, रवींद्र कोरडे सहकोशाध्यक्ष, तसेच संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते .
अँडो.गणेश आळंदीकर यांनी आजी-माजी सैनिक संघटनेचा आढावा देत प्रस्तावना केली, अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांनी स्वागत तर उपस्थितांचे आभार ताराचंद शेंडकर यांनी मानले.