बारामती - माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे पणदरे ता बारामती या गावचे हद्दीत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25/01/2025 रोजी दुपारी 12/00 वा चे सुमारास फिर्यादी नामे निलेश रामदास जगदाळे, वय 21 वर्ष, रा. जगताप आळी पणदरे ता बारामती, जि.पुणे, हे पणदरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे येथील कॉलेज समोरून रोडने जात असताना कॉलेज गेटच्या आत काही मुलामुलामध्ये भांडण चालु असल्याचे दिसलेने फिर्यादी गेटच्या आतमध्ये जावून पाहिले असता तेथे पणदरे गावातील अल्पवयीन मुलांची एकमेकांकडे पाहण्यावरून भांडण चालु होते, त्यानंतर भांडणे मिटवायची म्हणून सुतगिरणी पणदरे परिसरात फिर्यादी व बाकीचे अल्पवयीन मुले तेथे गेलेनंतर तेथे उपस्थित अल्पवयीन मुलाने दुसऱ्या बाजूचे अल्पवयीन मुलाशी याच्याशी वाद घालून कोयता घेवुन फिर्यादीचे अंगावर धावून त्याने फिर्यादीचे डोक्यात वार केला तो वार फिर्यादीने चुकविला असता तो फिर्यादीचे उजव्या खांदयावर बसला त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसरा वार केला तो वार फिर्यादीने उजवे हाताने तो आडविला असता फिर्यादीचे उजवे हाताचे कोपरास गंभीर जखम झाली.
अशा आशयाच्या फिर्यादी वरून गुन्हा रजि.नंबर - 20/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 351(3), 117(4), 189(2), 190, 191(2), 191(3) शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25 या प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून 03 हल्लेखोर अल्पवयीन मुलांना सदर गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेवून त्यांची रवानगी बाल न्यायालय, पुणे येथे केलेली आहे, उर्वरित हल्लेखोर यांचा शोध घेणे चालू आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण मा.डॉ.श्री.सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती तसेच स.पो.नि.सचिन लोखंडे, प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री.अमोल खटावकर हे करीत आहेत.