महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण तर सरचिटणीस पदी विजय चांदेकर यांचे बिनविरोध निवड.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर भव्य मोर्चाचा कृती समितीचा निर्धार.....
पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण यांची तर सरचिटणीस पदी विजय चांदेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. आकुर्डी पुणे येथील श्रम शक्ती भवन या ठिकाणी राज्यातील सात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
महाराष्ट्र राज्यातील एक लाख चाळीस हजार हून जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मोठ्या ताकतीने मार्गी लावण्यासाठी नुकतीच पुणे आकुर्डी या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीची स्थापना करण्यात आली. आहे.या बैठकीसाठी सात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी शासन दरबारी तीव्र लढा उभारण्यासाठी कृती समितीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण, कार्याध्यक्षपदी ज्ञानोबा घोणे, दिलीप जाधव उपाध्यक्ष अशोक गायकवाड, रमेश भोसले, श्रीकांत ढापसे, आसिफ पटेल सरचिटणीस पदी विजय चांदेकर, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे तर कोषाध्यक्ष भारत डोंगरे, सुभाष तुळवे, संघटक पदी प्रसिद्धीप्रमुख पदी राहुल तावरे, गोविंद म्हात्रे मार्गदर्शक म्हणून तानाजी ठोंबरे यांची तर कार्यकारणी सदस्य पदी राजेंद्र वाव्हळ, नीलकंठ डोके व महिला प्रतिनिधी म्हणून सुनीता लांडगे व स्वाती भालेराव, आरती हिवाळे यांची एकमुखी निवड करण्यात आली.
या बैठकीत राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अभयावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, किमान वेतनासाठी कमिटी स्थापन करणे, उत्पन्न आणि वसुलीची आट रद्द करणे, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ज्येष्ठता यादीतील पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 61 मध्ये सुधारणा करणे, बहुतांशी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करणे अथवा त्यात सुधारणा करणे इत्यादी मागण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.