सोमेश्वरनगर(विनोद गोलांडे).. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई येथे बुधवार दि. ०५ रोजी फन फेअर (आनंदमेळावा) अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी विविध स्टॉल लावत मेळाव्याची रंगत वाढवली.या कार्यक्रमाचे उद्घाटन इयत्ता ५वी अ मधील पालक श्री कुणाल ढमाळ व सौ. उगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध मजेशीर खेळ ,खाण्याचे भारतीय तसेच पाश्चात चटकदार पदार्थाची मेजवानी याचा विद्यार्थी पालकांनी मनसोक्त आनंद लुटला.शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकामधील हा बदल मुलांबरोबरच त्यांच्या पालकांसाठी आगळावेगळा ठरला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांचे संपूर्ण कार्यक्रमाला बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील शिक्षिका निर्मला खोमणे व सारिका काकडे यांनी केले.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.