उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने राबवीत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात पत्रकार संघाने पुढे येऊन केलेली जनजागृती मोलाची - सुरेंद्र निकम
छायाचित्र : डोर्लेवाडी (ता.बारामती) : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
पत्रकार संघ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व स्लो मोटर सायकल स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी निकम बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले,सरपंच सुप्रिया नाळे,सहेली फौंडेशन बारामतीच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस अविनाश काळकुटे,न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन माने, प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बालगुडे,बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले,सचिव चिंतामणी क्षीरसागर,मंगेश कचरे,गजानन हगवणे,गोरख जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
निकम म्हणाले,वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असतो.आपल्या बाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी समाजापुढे ठेवून त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी ते उत्तम पणे पार पाडत असतात. पत्रकार संघ नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवून प्रशासनास हातभार लावण्याचे काम करीत आलेला आहे.या संघाचे काम कौतुकास्पद आहे,
रस्ता सुरक्षा या विषयावर आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेत डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय,प्राथमिक केंद्र शाळा व गुणवडी येथील की एज्युकेशन बालविकास मंदीर व ज्युनिअर कॉलेज येथील १ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक - श्रेया काळोखे,यश जाधव,तेजश्री पवार द्वितीय क्रमांक – सिद्धनाथ मोरे,आरव केंजळे,स्वराली घाडगे, तृतीय क्रमांक – सोहम लोणकर, प्रसाद नरुटे,प्रणव काळोखे यांनी मिळविला.
मध्यम गट प्रथम क्रमांक – स्नेहल साबळे, द्वितीय क्रमांक - धनराज गावडे,तृतीय क्रमांक - सांची कुंभार यांनी मिळविला
मोठा गट प्रथम क्रमांक – आदिनाथ डोंबाळे,सोफिया शेख,द्वितीय क्रमांक – मंजिरी देवकाते,कार्तिकी जगताप,तृतीय क्रमांक – कृतिका पाटील,निधी मासाळ यांनी मिळविला.
निबंध स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक –गणेश कालगावकर,अलमिरा मनेर,श्रावणी वरकड,द्वितीय क्रमांक – समर्थ नवले,धनश्री वाघमोडे,कार्तिकी लोणकर तृतीय क्रमांक – दुर्वा गंधारे,राजवैभवी देवकाते,हर्षदा माने,स्वराली घाडगे यांनी मिळविला.
मोठा गट प्रथम क्रमांक –आदिती खटके,समृद्धी खापे,द्वितीय क्रमांक – श्रावणी गावडे,अनुष्का नाळे,तृतीय क्रमांक – श्रावणी देवकाते,सृष्टी आगवणे,आर्यन मासाळ यांनी मिळविला.
स्लो मोटर सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक जालिंदर बालगुडे, द्वितीय क्रमांक – गोरख जाधव व तृतीय क्रमांक नवनाथ गायकवाड यांनी मिळविला.विजयी स्पर्धकांना सहेली फौंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे यांच्या वतीने व मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्हे देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ भिले यांनी केले.सुत्रसंचालन शैलजा साळवे यांनी केले.चिंतामणी क्षीरसागर यांनी आभार मानले.