निधन वार्ता ! दिलीप शिंदे यांना मातृशोक
बारामती(प्रतिनिधी)ः बांदलवाडी (ता.बारामती) येथील अनुसया रामचंद्र शिंदे यांचे वयाच्या 85 वर्षी दुःखद निधन झाले आहे. अनुसया शिंदे या शांत, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने बांदलवाडीत शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, जावई, सुना, नातवंडे आहेत. बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व पुणे जिल्हा देखरेख संघाचे अध्यक्ष विजय रामचंद्र शिंदे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती जिल्ह्याचे संघचालक दिलीप रामचंद्र शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. सावडण्याचा विधी गुरुवार 1 मे 2025 रोजी सकाळी सात तीस वाजता बांदलवाडी येथे होणार आहे.