Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश.

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता १०वी च्या परीक्षेत आदित्य पंडित याने ९९.२०% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. वेदांती भोसले ९८.८०% व शौर्य जगताप ९६.४० गुण प्राप्त केले.
   इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून अर्पिता शिंदे हिला ९३%, यश पवार ८४.६० तर कादंबरी शिंदे ७२.६० गुण मिळवले. तसेच वाणिज्य शाखेतून अब्दुलक्वादिर भोरी ९१.८०% प्राजक्ता भोसले ८५.२०% तसेच सांची सुकाळे ८४.४०% गुण मिळवले.
    इयत्ता १०वी साठी ७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते तर विज्ञान व वाणिज्य विभागातून अनुक्रमे ४ व ३ विद्यार्थी प्रविष्ट होते.
    याही वर्षी शालान्त परीक्षेचा निकाल १००% लावत विद्यार्थ्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.
     यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले व मुलांच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test