वाणेवाडी येथे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे आरोग्य विमा आयुष्यमान भारत कार्ड 687 लाभार्थी यांना सरपंच गीतांजली जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मा सरपंच दिग्विजय जगताप आरोग्य सहायिका निंबाळकर मॅडम ,परवेश मुलाणी ,गणेश कदम, आरोग्य समुदाय अधिकारी सौरभ हंबीरराव ,आरोग्य सेविका स्वाती कुदळे, गटप्रवर्तक फरांदे मॅडम सर्व आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते
आयुष्यमान भारत कार्ड असलेल्या सदस्यांना शासनाकडून पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याने नागरिकांनमध्ये समाधान आहे.