तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद-तहसीलदार गणेश शिंदे
बारामती : तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
*तालुक्यात २३ मे अखेर सरासरी १४४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद*
बारामती मंडळात १७३ मि.मी. माळेगाव बु.९२-मि.मी., पणदरे ११२ मि.मी., वडगाव निंबाळकर १६५ मि.मी., लोणी भापकर १८४ मि.मी., मोरगाव १६८ मि.मी., सुपा १३० मि.मी., उंडवडी क.प.१२८ मि.मी. याप्रमाणे सरासरी मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
*२४ मे रोजी सरासरी ८२.८७ मि.मी पर्जन्यमानाची नोंद*
तालुक्यात २४ मे रोजी (शनिवारी) बारामती मंडळात १२७ मि.मी. माळेगाव बु.७५-मि.मी., पणदरे ९३ मि.मी., वडगाव निंबाळकर ९६ मि.मी., लोणी भापकर ९५ मि.मी., मोरगाव ६४ मि.मी., सुपा ४८ मि.मी., उंडवडी क.प.६५ मि.मी. याप्रमाणे सरासरी ८२.८७ मि. मी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.