Type Here to Get Search Results !

बारामतीचे सुपुत्र सोमेश्वरनगरचे भूषण आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे पुण्याचे नवे जिल्हा क्रीडा अधिकारी

बारामतीचे सुपुत्र सोमेश्वरनगरचे भूषण आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे पुण्याचे नवे जिल्हा क्रीडा अधिकारी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील जगन्नाथ लकडे म्हणजे एक मेंढपाळ चा मुलगा परिस्थिती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द च्या जोरावर त्यांनी कोणतेही अत्याधुनिक साहित्य नसताना हेच नाही तर पायात चप्पलही नसताना त्याची कसरत त्यावेळेस नीरा डाव्या कालव्या शेजारी अनवाणी पावलांनी पळतच झाली. त्यानंतर लकडे यांनी तालुका जिल्हा व राज्य पातळीवर क्रमांक घेत तो पळतच राहीला देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे त्याची मजल व सर्वांच्या आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तो पोचला तिथेच न थांबता लकडे यांनी आशियाई स्पर्धांमधून भारत देशाला ब्राँझपदक मिळवून दिले. असे जगन्नाथ लकडे यांची पुणे जिल्हा क्रीडा अधिकारीपदी निवड झाली आहे.
पुढे तो जन्मभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारी सेवेत समाविष्ट झाला. तालुका क्रीडा अधिकारी म्हणून त्याने ठाणें, मुंबई ,बारामती ई ठिकाणी क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक क्रीडा संकुले राज्य सरकारच्या मदतीने उभारली. पुढे जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर म्हणून तीन वर्ष त्यांनी लातूर जिल्ह्यात आपले स्थान निर्माण करत लातूर, नांदेड,नागपूर येथे प्रभारी उपसंचालक क्रीडा विभाग म्हणून काम पाहिले.आणि त्याच्या कामाची दखल घेत राज्यसरकारने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा पुणे येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून जगन्नाथ लकडे यांची निवड केली आहे. 

ज्या मातीत लकडे यांना कधीकाळी कसलीच सुविधा मिळाली नाही,त्या मातीत आता शेकडो क्रीडा पटू तयार करण्याची त्यांना जबाबदारी मिळाली आहे.प्रशासनातील अनुभव,आय ए एस व आय पी एस अधिकारी वर्गाशी त्यांचे असलेले सबंध याचा क्रीडा विभागाची धोरणे ठरवताना व प्रकल्प उभे करताना त्यांच्या पुण्यातील कार्यकाळात क्रीडा विभागाला नक्कीच फायदा होणार आहे. असा विश्वास सरकारने त्यांच्यावर टाकला आहे. देशाच्या राजकारणात गाजलेल्या बारामतीच्या नावाने क्रीडा क्षेत्रात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके घेऊन बारामती ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. 
        
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला पूर्वीपासूनच खूप मोठे प्रोत्साहन व मदत केली आहे.त्यांच्या मदतीने व सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या प्रोत्साहनाने मी भारताला पदक मिळवून आशिया खंडात देशाचे नाव करू शकलो. त्याच बरोबर बारामती तालुका क्रीडा अधिकारी असताना अजितदादा यांनी माझे काम पाहिले व वेगवेगळी संकुले उभारताना माझ्या कामाचे त्यांनी कौतुक केले त्यामुळेच मला पुणे जिल्ह्यात त्यांचे मार्गदर्शनाखाली तसेच दादांच्या व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्ह्यात काम करताना विशेष आनंद होत आहे. 

आज माजी सैनिक संघटना मुख्य शाखा सोमेश्वर तालुका बारामती तसेच सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप सह सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वच पदाधिकारी जेष्ठ मान्यवर   यांचा या यशाबद्दल मोठा वाटा आहे असे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी बोलताना सांगितले. 
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेऊ असेही लकडे म्हणाले.

.........
राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने शनिवारी ता.३० मे रोजी जगन्नाथ लकडे यांच्या बदलीचा आदेश पारीत झाला आहे.
अजितदादा व दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेऊ 
-: नवे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे :-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test