बारामती - जीवनात आपण आपल्या स्वच्छेने विविध दान देतो. ज्याप्रकारे रक्तदान मृतवत शरीरामध्ये प्राण संचारण्याचे काम करते त्याप्रकारे देहदान हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महादान ठरते. आज देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे. सर्व दानापेक्षा "मरणोत्तर देहदान" हे सर्वश्रेष्ठ समजले जाते कारण ते एक नव्या युगाचे पवित्र पुण्यकर्म आहे. मृत्युनंतर आपले शरीर दान करण्याची इच्छा संकल्पीत करणे व ती नातेवाईकांकडून पूर्ण करून घेण्याची व्यवस्था करून ठेवणे म्हणजेच देहदान होय.
१८ वर्षापुढील सर्व स्त्री व पुरुष कायद्याने मृत्यूनंतर देहदान करू शकतात. त्यासाठी जात /धर्म असा कोणताही भेद नाही. मृत्यूनंतर देहदान करण्या बद्दलच्या कायद्याच्या सर्व तरतुदी "Bombay Anatomy Act" मध्ये नमुद केलेल्या आहेत.
बारामतीतील रामकृष्ण लिंबराज सुरवडे(अण्णा)आज कैलासवासी झाले.त्यांनी मरणोत्तर देहदान करून एक आदर्श प्रस्थापित केला. दहा वर्षांपूर्वी त्यांनी हा देहदानाचा संकल्प करून ठेवला होता. समाजातील इतर काही लोकांना त्यांनी हा मनोदय सांगितला होता. कुटुंबियांनी ही त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे बहुतेक आपल्या बारामती मधील आपल्या समाजातील हे पहिलेच देहदान असावे. सुरवडे अण्णा एक स्वयंभू व्यक्तिमत्व लहानपणी च मातृपितृ छत्र हरपले मामांनी सांभाळ केला पुढे बारामतीला आले पडेल ती कामे केली प्रथम होमगार्ड म्हणून काम केले पुढे बारामती ला टी सी कॉलेज स्थापन झाले टी सीकॉलेज च्या स्थापणे पासून ते कॉलेज मध्ये काम करू लागले कॉलेज नावारूपाला आणणेत त्यांनी बहुमोल असे योगदान दिले शेवटी रजिस्टार पदावरून ते निवृत्त झाले
निवृत्त झालेवर सुद्धा ते गप्प बसले नाहीत अनेक सामाजिक संस्थावर त्यांनी काम केले शारदानगर येथील कॉलेज वर पण मार्गदर्शन केले जेष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रमा कोठारी ट्रस्ट या सामाजिक संस्था वर त्यांनी काम केले त्या बरोबर च प्रतिभा नागरी पतसंस्था, विरशैव नागरी पतं संस्था या आर्थिक संस्थेवर पण त्यांनी काम केले.
सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे आपल्या वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट वर विश्वस्त कार्यरत होते.. अण्णांनी अत्यंत चोखपणे काम करून एक छान शिस्त लावली होती श्री मन्मथ स्वामी मंगल भवन चे काम त्याच काळातले त्या हिशोबाची सर्व जबाबदारी त्यांचेकडून पार पडली त्याचवेळी आम्हा सर्वाना बरोबर घेऊन त्यांनी ओंकारेश्वर बचत गटाची स्थापना केली सुमारे बारा वर्ष त्यांनी बचत गटाचा हिशोब सांभाळला
ओंकारेश्वर सोसायटी चे पण त्यांनी काम पहिले मंदिर उभारणी साठी भरीव असे आर्थिक योगदान दिले अत्यंत हुरहुन्नरी व्यक्तिमत्व सामाजिक कार्याची प्रचंड आवड अनेक विध्यार्थी यांना शिष्यवृत्ती मिळवून दिल्या शेवट पर्यंत कार्यरत राहिले यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी हिरा यांची साथ लाभली.