सुनील तात्या धिवार एल एल.बी परीक्षा उत्तीर्ण
पुणे - बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी वयाच्या ५० व्या वर्षी खडतर प्रयत्न करुन पहिल्याच टप्प्यात तीन वर्षात एल.एल. बी अभ्यासक्रम पूर्ण करून फर्स्ट क्लास ने मुंबई विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण होऊन तरुण पिढी समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, धिवार यांनी सामाजिक जीवनात कार्यरत असताना त्यांनी बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. पोलीस स्टेशन असेल महसूल प्रशासन असेल या ठिकाणी सर्व सामान्य मानंसाच्या हाकेला धावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्व सामान्य जनतेत प्रतिमा आहे.
त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेत अनेक गोरगरीब लोकांना न्याय मि ळत नाही. कित्येकांना वकील मि ळत नाही. गोरगरीब लोकांना पोलीस स्टेशन तहसील, कोर्ट यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत वकील म्हणून कोर्टात जाता यावे व त्यांच्या अडीअडचणी सोडवता यावेत या एकाच उद्देशाने मी वकिल झालो अभ्यासक्रम पूर्ण केला. माझा मोठा मुलगा दुर्गेश हा सुद्धा वकील आहे. मी सुद्धा वकील व्हावं या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असणारे सेंट विल्फ्रेड कॉलेज पनवेल येथे ऍडमिशन घेऊन ही पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्त करताना खऱ्या अर्थाने माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण आईलाच असे वाटत होते की मी वकील व्हावे म्हणून परंतु माझ्या दुर्दैवाने आज माझी आई हयात नाही. ती जर जिवंत असती तर निश्चितच हा आनंदोत्सव जल्लोष साजरा केला असता.
......
माजी वकील पदवी माझ्या आईचा चरणी अर्पण करतो असे सुनिलतात्या धिवार यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बोलताना व्यक्त केली व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गोरगरिबांच्या न्यायप्रविस्टेला तडा न जाता त्यांना नक्कीच न्याय मिळुन देण्याचा प्रयत्न असेल.
....सुनील तात्या धिवार