वाणेवाडी येथे भारतीय पत्रकार संघाची बैठक संपन्न.
सोमेश्वरनगर - भारतीय पत्रकार संघाची बैठक बारामती तील वाणेवाडी येथे रविवार दि १५ रोजी संपन्न झाली. या बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा झाली.. त्यामध्ये संघ वाढ विविध उपक्रम व अधिकाधिक भारतीय पत्रकार संघ काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी बोलताना सांगितले तसेच संघ स्थापनेपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले इथून पुढे असेच एकत्र चांगले काम व उपक्रम राबविण्यात यावे असेही बोलताना माजी अध्यक्ष विनोद गोलांडे यांनी सांगितले तसेच सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगतात संघवाढ व संघाचे काम व उपक्रम याबद्दल चर्चा केली व सर्व सदस्यांच्या ठामपणे मागे उभे राहू.
सूत्रसंचालन सचिव शरद भगत यांनी केले तर सदर बैठकि दरम्यान बारामती नवनिर्वाचित कार्यकारणीतील अध्यक्ष मधुकर बनसोडे, उपाध्यक्ष महमद शेख,सचिव शरद भगत, माजी अध्यक्ष विनोद गोलांडे, संघटक निखिल नाटकर , खजिनदार सोमनाथ लोणकर,सहसचिव माधव झगडे, हल्लाकृती समिती अजय पिसाळ,प्रेस फोटो फोटोग्राफर जितेंद्र काकडे,पत्रकार सोमनाथ जाधव सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.