तालुकास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त अर्ज निकाली काढण्याचे तहसीलदाराचे निर्देश
बारामती.: नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय भवन येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. या लोकशाही दिनामध्ये एक अर्ज स्विकारण्यात आला असून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करुन वेळेत निकाली काढावा, असे निर्देश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले.
यावेळी एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.