सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेतील गणेश भिमराव मोकाशी यांनी पहिल्याच प्रयत्नात एल.एल. बी अभ्यासक्रम पूर्ण करून पुणे विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण झाले. गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत वकील म्हणून कोर्टात जाता यावे व त्यांच्या अडीअडचणी सोडवता यावेत या एकाच उद्देशाने मी वकिल झालो यामागे माझे प्रेरणास्थान माझे दिवंगत चुलते ॲड.जयवंत वामन मोकाशी तर ही पदवी प्राप्त करताना खऱ्या अर्थाने माझ्या आई वडील काकांसह माझे कुटुंब सदस्य यांचा मोठा वाटा आहे.
या यशाबद्दल सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व मित्रपरिवार यांच्यावतीने माझा सत्कार शाल पुष्पहार देत करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.