Type Here to Get Search Results !

उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात ९ जूनला लोकअदालतीचे आयोजन

उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात ९ जूनला लोकअदालतीचे आयोजन
 बारामती: -  उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व इंदापूर तहसीलदार कार्यालयांमध्ये सोमवार दि.9 जून रोजी 'महसूल लोकअदालत' आयोजित केली आहे. महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालत पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. 
महसूल विभागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दावे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र, या लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांचे एकमत झाल्यास तडजोडीतून दावे निकाली काढले जाणार आहे. ही महसूल लोक अदालत उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व तहसिल कार्यालय इंदापूर येथे सकाळी 11 वाजलेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील. सर्व तडजोड होऊ शकेल अशा दाव्यातील पक्षकारांनी प्रकरण लोकअदालतीत मांडून मार्ग काढावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी केले आहे.
0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test