२६ जून रोजी निरा कॉर्नर वरून...... तर २७ जून रोजी निरा- बारामती रोडने....
बारामती : श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने बारामती तालुक्यात २७ जूनपर्यत वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
बारामती तालुक्यातील निरा-बारामती रोडवरुन होणारी वाहतूक २६ जून २०२५ रोजी निरा कार्नर निंबुत वरुन मोरगाव रोडने चौधरवाडी फाट्यावरुन चौधरवाडीमार्गे करंजेपूल तसेच २७ जून रोजी निरा-बारामती रोडने होणारी वाहतूक ही कटींगनपुल, बजरंगवाडी, को-हाळे खुर्द मार्गे होळ, वाणेवाडी, करंजेपूलमार्गे निरा यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.