बारामती - बारामती येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग तर्फे संत तुकाराम महाराज पालखी सोहळामध्ये दिवसभर स्वयंसेवेचे काम केले.वारीमध्ये अखंड पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना शिकवण्याबरोबर समाजसेवेची शिकवण देणाऱ्या फ्लोरेट कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत “माउलींच्या सेवेत” दिवसभर स्वयंसेवेचे काम केले.
या उपक्रमांतर्गत, फ्लोरेट कॉलेज तर्फे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि ऊर्जादायक खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. वारीतील थकवा दूर करण्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरली
वारीतील भक्तीभाव, शिस्त आणि एकात्मतेचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्येही समर्पण आणि संघभावनेचा विकास झाला.
“डिझाईन शिकवताना माणुसकीचे आणि समाजसेवेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे,”
वारकऱ्यांसाठी ही सेवा हा केवळ मदतीचा नव्हे, तर समाजाशी जोडलेला भावनिक संबंध होता असे
स्टडी सेंटर हेड - प्रथमेश अशोक राऊत सर
कॉलेजचे शिक्षक - ऋतुजा तावरे मॅडम, प्राजक्ता राठोड मॅडम यांनी सांगितले कॉलेजचे एकूण ३५ विद्यार्थी या सर्वांनी मिळून फिल्टरड पाणी बॉटल वारकऱ्यांची सेवा म्हणुन त्यांनी वाटप केले अनेक वारकऱ्यांनी फ्लोरेटच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले.