Type Here to Get Search Results !

बारामती ! सायबर सेफ योगा डे उत्साहात साजरा

बारामती ! सायबर सेफ योगा डे उत्साहात साजरा 
बारामतीः तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा या अंतर्गत “सायबर सेफ योगा डे“साजरा करण्यात आला. 
 बी.बी.ए (सी.ए.) विभाग व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात बी.बी.ए (सी.ए.) विभागातील प्रा.सौ.सलमा शेख यानी सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा या विषयीची संकल्पना स्पष्ट केली. या विषयावर विविध घोषवाक्ये, प्रेरणादायी विचार सेल्फी पॉईंट, आणि छोटेखानी साइबर सुरक्षा मार्गदर्शन देण्यात आले.
 यामध्ये Cyber Safe 1 Yoga, ज्या अंतर्गत सायबर सुरक्षा पालन करण्याचे आवाहन करण्यात आले, ज्याचा उद्देश उपस्थित सर्वांना साइबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्याविषयी जागरूक करणे होता. सर्व सहभागी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले व चांगला प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, सर्व अधिष्ठाता, क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, कार्यसंघ सदस्य साक्षी लवंगारे, गायत्री केसकर, दिपू सिंग या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
 सहभागी विद्यार्थ्यांमध्ये क्लबचे अध्यक्ष, अभय साहू, सचिव संदीप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मीडिया संचालक सायली ढगे, सायबर वॉरियर वरद साळवे, रोहन लोखंडे, वृषाली जांभोरे, बाळकृष्ण शिंदे, यश झिंगाडे, विवेक रसाळ, रेणुका पानसरे यांनी काम पाहिले. सदर उपक्रमासाठी माधुरी सस्ते, रेश्मा बाबर, अश्विनी भोसले, दत्तात्रय आरडे, तृप्ती भोसले, स्मिता कचरे यांनी विशेष मेहनत घेतली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test