सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा ५३ वा वर्धापन दिन २० जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॄहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रोफेसर मा. डॉ. प्रशांत साठे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभासदस्य तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यातील तरतुदी, महाविद्यलयाच्या समोरील संधी आणि नवी आवाहने याबाबत सविस्तर विवेचन केले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी ते म्हणाले ५३ वर्षात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले, यावेळी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमान्यामध्ये आपली बुद्धिमत्ता ही कृत्रिम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण महागड्या वस्तू वापरल्या म्हणजे बुद्धिमान नसून बुद्धीच तुम्हाला वरच्या दर्जा वरती नेऊन ठेवते. अनुभूती व अनुभवातून शिक्षण घेऊन त्या शिक्षणातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताला जर विकसित करायचे असेल तर 'PUARA- Provision of Urban Amenities to Rural Area' नावाचे तत्त्वज्ञान वापरले पाहिजे तरच भारत हा विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला. या महाविद्यालयाने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली ही एक अभिमानाची गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचे आहे, कोणतेही काम करत असताना पुढील पाच ते सात वर्ष नियोजन आराखडा आपल्या जवळ असला तरच तो जीवनात यशस्वी होऊ शकतो असे आवर्जून सांगितले आणि शेवटी त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आधिसभा सदस्य ॲड. मा.संदीप कदम यांनी महाविद्यालयाने ५३ वर्षात तळागाळातील, वंचित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन केलेले प्रगती हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे आवर्जून सांगितले. आज महाविद्यालय ५३ वर्षांचा खडतर प्रवास करून यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आहे यासाठी चार घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे ते घटक म्हणजेच व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या योगदानामुळेच ते शक्य झाले आणि शेवटी. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाने केलेल्या प्रगती आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी या विषयी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय मनोगता मध्ये अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले म्हणून त्यांचे स्वागत व आभार मानले व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अच्युत शिंदे यांनी मानले.