श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गक्रमण होतो त्या आळंदी - पंढरपूर या महामार्गावरील पहिले माऊली पादुका स्नान होते अशा सातारा अथवा पुणे जिल्ह्य़ातील प्रवेश द्वारातील निरा नदीवर जुना व नवीन उड्डाण पुल (ब्रिज) आहे. जुन्या पुलाची क्षमता पाहुन लगतच काही वर्षांपूर्वी नवीन उड्डाण पुल उभारण्यात आला आहे या नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावर अनेक समस्यांचा विळखा असुन येथे अपघातातून अनेकांचे प्राण गमवावे लागले आहेत तसेच काही वर्षांपूर्वी याच पुलावरून माऊली भक्तांचा ट्रक कोसळुन अपघात झाला होता . सातारा व पुणे जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या पुलाला व परिसराला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येण्यापूर्वी दोन्ही जिल्हयाचे प्रशासकीय यंत्रणां तसेच लोकप्रतिनिधी भेटी देऊन पाहणी करित असतात. तसेच पुर्वी लोणंद - निरा रस्त्यात रेल्वेचे क्राॅसिंग फाटक होते, फाटक लागले नंतर अनेक वाहन धारकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असायचे याचे निवारण होऊन येथे नव्याने उड्डाण पूलाची उभारणी झाली परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन्ही पुल उभारणी पासून आजतागायत या पुलांवर स्ट्रिट लाईट बसवण्यात आले नसल्याने वाहनधारक व पादचारींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
रात्री व निर्जनवेळी हे पुल व परिसरात खुप अंधकार पसरलेला असतो या पुलांवरुन लाखो वाहने ये जा करित असतात येथे नागरिकांना ये जा करण्यासाठी पदचारी मार्ग देखील आहेत, निर्जनवेळी रात्री अपरात्री येथुन वाहनधारक अथवा पदचारींना खास करुन मुली महिलांना जिव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी घातपात, चोरी मारी, अथवा अपघाताचे प्रमाण पाहता हे परिसर प्रकाशमय होणे अत्यंत गरजेचे आहेत. याच महामार्गावरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलांवर जसे स्ट्रिट लाईट्स अथवा डेकोरेटर लाइट्स बसविण्यात आले आहेत त्याच पद्धतीने सुरक्षिततेच्या व सुशोभीकरणाच्या दृष्टीने या पुलांवर देखील दोन्ही बाजूला खांब उभारून सुशोभित असे स्ट्रिट लाइट अथवा चांगल्या क्षमतेचे डेकोरेटर लाइट्स बसविण्यात येवून लोणंद - निरा रेल्वे ब्रीज व निरा नदीच्या सुरक्षितता व सौंदर्यात भर घालावी आणि या गंभीर समस्यांचे निवारण करत पदचारी व वाहनधारकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व जिल्हाधिकारी सो सातारा यांकडे मेलद्वारे दिले आहे.