मुस्लिम जमात वतीने संत सोपानकाका पालखी सोहळ्यास व अल्पोपहाराचे आयोजन
सोमेश्वरनगर - श्री संत श्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीच्या माय माऊलींच्या वारकरी संप्रदाय यांचे वडगाव निंबाळकर मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम जमात वडगाव निंबाळकर यांच्यातर्फे संत सोपानकाका महाराज पालखीचे वारकरी व माय माऊली यांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी संतश्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखीचे विश्वस्त डॉक्टर त्रिगुण गोसावी यांचे देखील यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी त्रिगुण गोसावी यांनी मुस्लिम समाजाची बोलताना आपण याच प्रकारे कार्य करीत रहा माऊली आपल्या पाठीशी आहे असे संबोधले .
यावेळी वडगाव निंबाळकर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्ष जहांगीर शेख, सचिव इकबाल शेख, खजिनदार रिजवान पठाण , स्पर्धा परीक्षा युवा मंच चे संस्थापक शेख सर , टिपू भालदार, फिरोज भालदार , सलमान आत्तार, जावेद बागवान , इकबाल आत्तार ,शहीद बागवान ,फरदीन बागवान, इरफान बागवान ,सोहेल भालदार, चांद बागवान, साद बागवान व मुस्लिम जमात आदी वडगाव निंबाळकर ग्रामस्थ उपस्थित होती .