Type Here to Get Search Results !

प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
मुख्य संपादक विनोद गोलांडे 
पुणे - बालगंधर्व परिवाराच्या वतीने ५७ व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक  व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर 
या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने "प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता" या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा " बालगंधर्व विशेष सन्मान" पुरस्कार  मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री- सहकार व विमान वाहतूक, भारत सरकार), मराठी विनोदी चित्रपट अभिनेते  प्रशांत दामले  अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व मेघराज राजेभोसले अध्यक्ष बालगंधर्व परिवार व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 
या मान्यवरांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
   याप्रसंगी संभाजीराव काकडे- देशमुख, बापूराव जेधे, विठ्ठलराव माने,निखिल गायकवाड, प्रा. शाम जगताप, प्रा.तेजस जेजुरकर, दत्तात्रय जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रा. हनुमंत माने यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे. व संभाषण कौशल्य विकसित व्हावे. यासाठी संभाषण कला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे.प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. ते स्वतः प्रतिभावंत कवी, लेखक, निवेदक, सूत्रसंचालक, प्रभावी वक्ते व मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन, निवेदन, व्याख्यानमाला, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र व मुलाखत इ. उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.
 आजपर्यंत त्यांच्या या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर विविध संस्थांनी १३ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
 
प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. माने यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test