Crime News वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील निरा डाव्या कालव्याच्या लोखंडी पुलावर बोलवत तेथील शेजारीच शेतातील इंजिनघरात नेऊन जर तू कोणाला हा प्रकार सांगितला तर तुला खल्लास कारेन, तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसांकडून पोस्को अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा ऊर्फ ऋतिक वायकर रा.करंजेपुल ता.बारामती जि.पुणे व बाळा ऊर्फ दयानंद होळकर रा.होळ ता.बारामती जि.पुणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार दि. १ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक वायकर याने पीडितेच्या वाढदिवसाचे दिवशी तिला फोन करून तुला वाढदिवसाचे गिफ्ट दयायचे आहे तु लोखंडी पुलाचे पलीकडे ये असे सांगुन बोलावुन घेतले. अंधारात लोखंडी पुलाचे पलीकडे जबरदस्तीने जवळ असलेले शेतातातील विहीरीसाठी बांधलेली रुममध्ये नेवुन पीडियतेच्या अंगाशी जबरदस्तीने लगट केली. तसेच बळजबरीने शारीरीक संबंध ठवेले आहेत. तु जर कोणाला सांगितले तर तुला खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली तसेच आरोपलपी दयानंद होळकर यानेही पीडितेच्या घरी एकटीच असताना घरामध्ये जबरदस्तीने घुसुन लओरडू नये तोंड दाबुन लजबरदस्तीने शरीरसंबंध केले. ती गोष्ट कोणाला सांगितली तर तुझे भावाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली परत आरोपी ऋत्विक वायकर याने जबरदस्तीने त्याचा मित्र सनी यादव रा.वाघळवाडी ता.बारामती यांचे घरी नेले त्यावेळी त्याचे घरी कोणी नसताना त्यांचे घराचे दरवाज्यास आतुन कडी लावुन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले व तु हा प्रकार कोणास सांगु नको जर सांगितला मी तुझे वाटोळे करेन तुझे लग्न होवु देणार नाही. तसेच तु जर हा प्रकार पोलीसांना सांगितला तर मी जेलमधुन सुटलेवर तुला व तुझे घरातील एकालाही जीवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली . पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र चे पी एस आय राहुल साबळे करत आहेत.