करंजे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करत साजरा
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या वादिवसनिमित्त शुक्रवार दि २५ रोजी बारामती तालुक्यातील करंजेगाव येथे ग्रामपंचायत परिसरात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करत साजरा करण्यात आला.
नवनिर्वाचित उपसरपंच खुर्शिदा मुलाणी यांचा सत्कार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ज्योतीताई लडकत यांनी शाल ,साडी,श्रीफळ देत केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब हुंबरे, उपसरपंच खुर्शिदा मुलाणी ,माजी उपसरपंच माऊली केंजळे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस वैशाली सावंत व निरा कृषी उत्पादन बाजार समिती उपसभापती बाळासाहेब शिंदे, बारामती तालुका कार्याध्यक्ष सुचिता साळवे, प्रताप गायकवाड सह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.