Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

बारामती  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन झाले आहे. यावेळी 100 महिलांना रक्तवाढीच्या मोफत गोळ्या व औषधांचे, दिव्यांग रुग्णांना 44 वॉकर आणि वृध्द व दिव्याग रुग्णांना 15 व्हील चेअर वाटप करण्यात आले. सदरच्या गोळ्या व औषधे, वॉकर आणि व्हील चेअर विविध क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्राप्त झाले होते.
यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे मुख्य प्रबंधक आदिल्य गोगटे, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, प्राध्यापिका डॉ. अंजली शेटे,सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरज जाधवर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सौरभ मुथा, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, समाजसेवा अधिक्षक बालाजी चांडोळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test