सोमेश्वरनगर - २६जुलै रोजी आजी माजी सैनिक संघटना ऑफिस कार्यालय येथे दर वर्षी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत असतो या अनुषंगाने शनिवार दि २६ रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
१९९९ साली झालेल्या युद्धात प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान असतो. या दिवसाचे उद्दिष्ट तरुणांमध्ये देशभक्ती, अभिमान, आणि कृतज्ञेची भावना निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकता आणि त्यागाची भावना बळकट करणे म्हणून देशभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.
यावेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष ताराचंद शेंडकर, ज्येष्ठ सैनिक सल्लागार राजाराम शेंडकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, खजिनदार राजेंद्र पवार, सह खजिनदार रवींद्र कोरडे, सदस्य मीनानाथ होळकर, सुनील हरिअर पत्रकार विनोद गोलांडे उपस्थित होते.