मुख्य संपादक विनोद गोलांडे...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा रोलर पुजन सभारंभ सोमवार दि.३० जुन २०२५ रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष मिलींद कांबळे व संचालक अभिजीत काकडे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, येणा-या गाळप हंगामासाठी कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतीपथावर असुन गतवर्षीप्रमाणेच आपला हंगाम यशस्वी व सुरळीत पार पडेल अशी खात्री आहे. जगताप पुढे म्हणाले की, येणा-या हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही पुर्ण झाले असुन आजपर्यंत ११२० बैलगाडी, ६०० डंपिग, २० ट्रक, ३७० ट्रॅक्टर, ३० हार्वेस्ट्रचे करार पुर्ण झाले असुन पहिल्या हप्त्याचे देखील वाटप आपण केलेले आहे. येणा-या हंगामासाठी शेतकी विभागाकडे एकुण ३५ हजार ५१२ एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली असुन यात आडसाली १४४९२ एकर, पुर्वहंगामी ७९१६ एकर, सुरु ४१३२ एकर, खोडवा ८९७२ एकर नोंद आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. या नोंद झालेल्या क्षेत्रातुन अंदाजे १२ ते १२.५० लाख मे.टन ऊस आपणास गाळपास उपलब्ध होईल. जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याच्या शेतकी विभागाने हार्वेस्ट्ररने तोड होणेकरीता सभासद शेतक-यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा या केलेल्या आवाहनास सभासद शेतक-यांनी सहकार्य करुन जास्तीत जास्त पट्टा पद्धत अवलंबवावी.
यावेळी कारखान्याचे संचालक सुनिल भगत, शैलेश रासकर, बाळासाहेब कामथे, संग्राम सोरटे, ऋषीकेश गायकवाड, किसन तांबे,अजय कदम, हरीभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर एन.एच. नायकोडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.