Type Here to Get Search Results !

बारामती ! कृषीदिनानिमित्त पणदरे येथे कृषिदूतांकडून वृक्षारोपण

बारामती ! कृषीदिनानिमित्त पणदरे येथे कृषिदूतांकडून वृक्षारोपण
बारामती:ॲग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय शारदानगरचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी पणदरे येथे वास्तव्य करत आहेत.
पणदरे येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून एक जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायतराज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री होते असे यावेळी कृषीदूतांनी सांगितले.
यावेळी पणदरे गावचे सरपंच अजय सोनवणे,उपसरपंच,सदस्य, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 कृषीदूत रिद्धीश पाटील,अनिकेत लकडे,वेद चौधरी,हर्षद गरुड,अमित नवले,तेजस शितोळे,अनुराग क्षीरसागर,शिवम जगताप,सुधांशु कुमावत आणि मुकुंद शेजवळ आदींनी वृक्षरोपण करीत गावाकऱ्यांना पर्यवरणाचे महत्व पटवून दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test